देशातल्या महत्त्वाच्या शहरांत हाय अलर्ट

December 25, 2009 12:13 PM0 commentsViews: 2

25 डिसेंबरख्रिसमस, मोहरम आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्र सरकारने हायअलर्टची घोषणा केली आहे. मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हायअलर्ट घोषीत करण्यात आलं आहे. पाच तालाबानी अतिरेक्यांनी भारतात प्रवेश केला असण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिलाय. 26/11 प्रमाणेच सरकारी इमारतींवर हल्ला करून लोकांना ओलीस ठेवण्याचा त्यांचा कट असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तानातल्या अतिरेक्यांदरम्यान पश्तून भाषेत झालेलं संभाषण गुप्तचर संस्थांनी रेकॉर्ड केलं आहे.

close