शीना बोरा खून प्रकरणी राहुल मुखर्जीची चौकशी

August 27, 2015 8:31 AM0 commentsViews:

Rahul Sheena27 ऑगस्ट : शीना बोरा खून प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा राहुल मुखर्जीची चौकशी केली. राहुल हा स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांचा पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आहे. राहुल आणि शीना बोरा यांचे सुमारे वर्षभर प्रेमसंबंध होते, ते इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांनाही मंजूर नव्हते. पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा पासपोर्ट, तसंच तिचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.

मुंबई पोलिसांनी शीना बोरा खून प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. शीनाची आई इंद्राणी मुखर्जीनंच शीनाचा खून केल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली आहे. त्यानुसार, 24 एप्रिल 2012 या दिवशी ड्रायव्हर श्याम राय आणि आधीचा पती संजीव खन्ना यांच्या मदतीनं इंद्राणीनं शीनाचा खून केला. या तिघांनी कारमध्ये शीनाचा गळा आवळून खून केला, त्यानंतर त्यांनी रायगडमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह त्यांनी जाळण्याचा प्रयत्नही केला. तपासादरम्यान, शीना ही आपली बहीण नसून विवाहपूर्व संबंधातून झालेली मुलगी असल्याची कबुलीही इंद्राणीनं दिली. संजीव खन्नाला कोलकाता पोलिसांनी अटक केलीये. त्याला मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close