मुंबईत मेट्रो सुसाट, मेट्रोसाठी 35,400 कोटींची मंजुरी

August 27, 2015 8:52 AM0 commentsViews:

thane metro mmrda27 ऑगस्ट : मुंबईत एमएमआरडीएची 138 वी प्राधिकरण बैठक मुंबईच्या विकासाच्या वेगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली.
बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द तर दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व-वांद्रे पूर्व आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यामार्गावरील मेट्रोचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो रेल्वेचं काम आणखी वेगवान व्हावं यादृष्टीने मेट्रोसाठी 35 हजार 400 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे.

तसंच या बैठकीत मुंबई आणि आसपासच्या परिसराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या खर्चांना मंजुरी देण्यात आली.याशिवाय कल्याण आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत होत असलेली मुंबई महापाोलिकेची निवडणूक आणि येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेली कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांना राजकीयदृष्टयाही महत्त्व आहे.

कोणत्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली ?
- 40 किमी. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्ग – 12000 कोटी रुपये
- 40 किमीचा वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्ग – 12000 कोटी रु.
- 27 किमीचा दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व-वांद्रे पूर्व मेट्रो मार्ग – 8100 रुपये
- 11 किमीचा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मेट्रो मार्ग – 3300 कोटी रु.

मेट्रो भरारी !

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेल्या मुंबईतील दोन नव्या मेट्रो मार्गांच्या प्रकल्प अहवालाला सुद्धा सरकारी मान्यता मिळाली आहे. यामध्ये अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा साडेसोळा किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. ज्यासाठी 4737 कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे.
दुसरा मेट्रो मार्ग आहे दहिसर ते अंधेरीतील डी.एन.नगरपर्यंतचा, यासाठी 4994 कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे.

याशिवाय मुंबईत काही नव्या प्रकल्पांना MMRDA ची प्रशासकीय मंजुरी मिळालेली
- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तीन एलिव्हेटेड रोड
- सांताक्रुझ-चेंबूर जंक्शन एलिव्हेटेड रोड -
दोन्हीसाठी खर्च अपेक्षित आहे 743 कोटी रुपये.
- MTNL जंक्शन-LBS फ्लायओव्हर
- कुर्ला ते वाकोला एलिव्हेटेड रोड

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला स्मार्ट दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी 95 कोटी 57 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये वाय-फाय सेवा, स्मार्ट पार्किंग, सगळ्या इमारतींची एकत्रित देखरेख पद्धत, रस्त्यांवर आधुनिक दिवे, बससेवा यांचा समावेश आहे.

कल्याण ग्रोथ सेंटर

कल्याण आणि आसपासच्या भागाचा विकास करण्यासाठी कल्याण ग्रोथ सेंटरही विकसित केलं जाणार आहे. ज्यासाठी 1089 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 60.61 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close