बाळगंगा घोटाळ्याप्रकरणी आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी

August 27, 2015 12:32 PM0 commentsViews:

balganga 427 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्प घोटाळ्यात बुधवारी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. माजी उप अभियंता राजेश रिठे आणि कंत्राटदार निसार खत्री अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहे. काल ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीच्या कारवाईनंतर या दोघांना अटक झाली होती.

बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्या प्रकरणी राजेश रिठे आणि निसार खत्री यांना अटक करण्यात आलीय. ठाण्यातल्या कोपरी पोलिसांनी ही कारवाई केलीय. राजेश रिठे हे रायगडचे माजी उपअभियंता आहेत. तर निसार खत्री कंत्राटदार आहे. रायगडे जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातील्या घोटाळ्या प्रकरणी, मुख्य इंजिनिअर बाळासाहेब पाटीलसह, पाच इंजिनिअर आणि काँट्रॅक्टर अशा सगळ्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.खोटी कागदपत्रं तयार कऱणे, कट रचणे आणि पदाचा वापर करुन सरकारचं नुकसान करणे, स्वत:चा फायदा करुन घेणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबियाविरोधातही गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

दरम्यान, एसीबीने बाळगंगा सिंचन घोटाळ्यातल्या आरोपींविरोधात 16 ठिकाणी छापे टाकले आहे. त्यात मोठ्या, प्रमाणात मुद्दे माल मिळालाय. आजही हे छापा सत्र सुरूच आहे. बाळगंगा प्रकल्पातल्या घोटाळ्यातला मुख्य आरोपी गिरीश बाबर, तत्कालीन कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विभाग हे मुळचे पुण्यातले असले तरी त्यांचं एक घर ठाण्यात आहे. ठाण्यातल्या राम मारुती क्रॉस रोड इथल्या समीर अपार्टमेंट या हिल्डिंगमध्ये त्यांचं घर आहे. यावर ठाण्यातल्या एसीबीने छापा टाकलाय. या घराची झडती सुरू आहे आणि बाबर कुटुंबीयांची चौकशीही सुरू आहे.

बाळगंगा सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी
बाळासाहेब पाटील, माजी मुख्य अभियंता, कोकण पाटबंधारे विभाग
राजेश रिठे, माजी उप अभियंता, रायगड
गिरीष बाबर, माजी कार्यकारी संचालक
विजय कासट, माजी जलसिंचन अभियंता, कोलाड
रामचंद्र शिंदे, माजी जलसिंचन अभियंता, ठाणे
आनंद काळोखे, माजी जलसिंचन अभियंता, कोलाड
निसार खत्री, कंत्राटदार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close