लव्ह, हेट आणि मर्डर !

August 27, 2015 12:55 PM0 commentsViews:

27 ऑगस्ट : शीना व्होरा हिच्या मर्डर मिस्ट्रीने मुंबईच्या न्यूज वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. कारण हा गुन्हा फक्त हायप्रोफाईलच नाही तर त्याला नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचे अनेक कंगोरे देखील आहेत. या मर्डर मिस्ट्रीवर एखादा सिनेमा देखील निघू शकतो..ही मर्डर मिस्ट्रीय काय आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत…

indrani mukerjea and shinaशीना व्होराची हत्या खरंतर 2012सालीच झालीय. पण त्याचा उलगडा आत्ता झालाय….तोही एका निनावी फोनमुळे…खारच्या पोलिसांना दोन तीन दिवसांपूर्वी या गुन्ह्याची टिप मिळाली…की इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्याम रॉय याचा एका मोठ्या गुन्ह्यात सहभाग आहे…मग पोलिसांनी लागलीच त्याला उचलला…आणि चौकशी केली तर भलतीच खळबळजणक माहिती समोर आली. इंद्राणीचा चालक आणि तिने मिळून शीना व्होराचा खून केलाय…आणि तो रायगडच्या फार्म हाऊसवर पुुरून टाकलाय. ड्रायव्हरच्या चौकशीनंतर पोलिसांनी या इंद्राणी मुखर्जीलाही अटक केली…पण ही बाई निघाली…थेट एका इंग्रजी चॅनलची प्रमुख एवढचं नाहीतर तिचा दुुसरा पती म्हणजेच पीटर मुखर्जी हा देखील स्टार इंडियाचा माजी सीईओ…तिथच ही पोलिसांचे डोळे चमकले…पण पोलिसांनी न डगमगता चौकशी केली. तेव्हा इंद्राणीने खून झालेली ही व्यक्ती माझीच बहीण असल्याचा दावा केला. सर्व माध्यमांनी देखील शीना व्होरा ही इंद्राणी मुखर्जीची छोटी बहिण असल्याचं दाखवलं. पण बुधवारी याच प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली. आणि ती म्हणजे शीना व्होरा ही इंद्राणीची बहिण नाहीतर तिचीच सख्खी मुलगी आहे..पण पहिल्या पतीचे अपत्य..आता तुम्ही म्हणाल..या हायप्रोफाईल बयेने स्वतःच्या मुलीचा खून का केला..तर त्याचीही मोठी मर्डर मिस्ट्री आहे.

असं म्हणतात, शीना व्होरा आणि राहुल मुखर्जीचे कथित प्रेमसंबंध होते म्हणे…आता तुम्ही म्हणाल…यात काय ते नवल…मुली मुलीत प्रेमसंबंध होणारच…पण हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये….राहुल मुखर्जी हा निघाला इंद्राणीच्या दुसर्‍या पतीचा म्हणजेच पीटर मुखर्जीचा मुलगा…अगदीच्या नात्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हे दोघं सावत्र बहिणभाऊ होतात…म्हणूनच इंद्राणीचा आणि तिच्या आजी-माजी पतीचा देखील या प्रेमसंबंधाना विरोध होता म्हणे…आणि त्यातूनच हा खून झाला असावा…अर्थात यामध्ये खरं काय ते अजून स्पष्ट व्हायचंय आम्ही फक्त एक शक्यता मांडली. या संपत्तीचा वादही या खूनामागचं कारण असू शकतं. दरम्यान, पोलिसांनी याच गुन्ह्याच इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना यालाही अटक केलीय. त्यामुळे या खूनामागचं रहस्य आणखीच गूढ होत चाललंय. पण एकूणच या न्यूज इंड्रस्टीशी संबंधीत असलेल्या या मर्डर मिस्ट्रीने चांगलीच खळबळ उडवून दिलीय. म्हणतात ना मोठ्या लोकांच्या भानगडी देखील मोठ्या गुंतागुंतीच्या असतात तेच खरं…

नेमकं या प्रकरणी कुणाचं कोण आहे ?

- इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती – संजीव खन्ना
- या दाम्पत्याला दोन मुलं – शीना बोरा आणि मिखिल बोरा
- काही वर्षांनतर इंद्राणी आणि संजीव खन्ना विभक्त
- इंद्राणीने पीटर मुखर्जीशी केलं लग्न
- पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा – राहुल मुखर्जी
- राहुल मुखर्जी आणि शीना बोरा यांचे कथित प्रेमसंबंध
- हे संबंध इंद्राणी मुखर्जीला मान्य नसल्याचा पीटर मुखर्जीचा दावा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close