शीना बोरा हत्या : इंद्राणीने दुसर्‍या पतीलाही शीना बहीणच असल्याचं सांगितलं !

August 27, 2015 1:28 PM0 commentsViews:

Muder mystry27 ऑगस्ट : शीना बोरा हत्या प्रकरणाचं गूढ वाढतच चाललंय. शीनाचा दुसरा पती संजीव खन्नाची कोलकात्यामध्ये चौकशी झाली. त्यात त्यानं अनेक नवे खुलासे केलेत. शीना ही इंद्राणीची बहीणच होती, मुलगी असल्याबद्दल आपल्याला माहिती नव्हती, असा दावा संजीव खन्नानं केलाय. तसंच इंद्राणी पहिल्या लग्नाआधीच गर्भवती होती असा दावाही त्यांनी केला.

तर दुसरीकडे इंद्राणीचे सध्याचे पती माजी मीडिया सम्राट पीटर मुखर्जी यांचीही चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी आज पुन्हा राहुल मुखर्जीची चौकशी केली. बुधवारी रात्र उशिरा त्याची चौकशी झाली होती. राहुल हा पीटर मुखर्जी यांचा पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आहे. राहुल आणि शीना बोरा यांचे सुमारे वर्षभर प्रेमसंबंध होते, ते इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांनाही मंजूर नव्हते. पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा पासपोर्ट, तसंच तिचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. इंद्राणीला चौकशीसाठी अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचं समजतंय.

शीनाचा भाऊ मिखाईलला होता मारण्याचा कट ?

दरम्यान, शीनाचा भाऊ मिखाईललाही मारण्याचा कट होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी व्यक्त केलीय. मिखाईल शीनाचा ठावठिकाणा सातत्यानं विचारत होता. आणि त्यामुळेच मिखाईल हा इंद्राणी आणि आधीचा पती संजीव खन्नाच्या टार्गेटवर होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय.

शीनाचा खून 24 एप्रिलला राजीनामा मे महिन्यात !

शीना बोराच्या हत्याप्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलंय. शीना बोरानं दिलेल्या राजीनाम्याचं पत्र पोलिसांच्या हाती लागलंय. पण त्यात गोंधळ आहे. कारण शीनाचा खून 24 एप्रिल 2012 रोजी झाला होता. आणि शीनाचा राजीनामा मे 2012 मध्ये पाठवला गेला होता. खून झाल्यानंतर राजीनामा कसा दिला याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close