जॅकेट कचर्‍यात फेकलं नाही : सफाई कर्मचार्‍याचा दावा

December 25, 2009 1:23 PM0 commentsViews:

25 डिसेंबर शहिद हेमंत करकरे यांचं जॅकेट कचरापेटीत टाकलं नसल्याचा दावा जे. जे. हॉस्पिटलच्या सफाई कर्मचार्‍याने आयबीएन-लोकमतकडे केला आहे. आपण जॅकेट टाकलंच नाही, तर ते कचर्‍याच्या एका बॅगमध्ये ठेवल्याचं त्याचं म्हणणं आहे. माझी ड्युटी संपल्यावर मी घरी गेलो. त्यानंतर जॅकेटचं पुढे काय झालं याबाबत आपल्याला माहीत नसल्याचंही दिनेश गटार या सफाई कर्मचार्‍याने सांगितलं आहे. दोनच दिवसांपूर्वी करकरेंचं जॅकेट कचर्‍यात टाकल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता सफाई कर्मचार्‍याने दिलेल्या नव्या माहितीमुळे शहिद हेमंत करकरे यांच्या गहाळ जॅकेटचं गूढ आणखी वाढलं आहे.

close