गुजरातमध्ये तणावपूर्ण शांतता, हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू

August 27, 2015 1:55 PM0 commentsViews:

gujrat_patel_jpg (10)27 ऑगस्ट : पटेल आरक्षणाच्या आंदोलनावरून गुजरातमध्ये तणाव आहे. आरक्षणावरून राज्यभर झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी पटेल समाजानं केलीय. तसंच हिंसाचारात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना 30 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केलीय.

दरम्यान, सूरत, राजकोट, मेहसानामध्ये लष्कराच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्यात. मंगळवारी रात्री हार्दिक पटेला ताब्यात घेतल्यानंतर पटेल समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये हिंसाचार उसळला.या तणावामुळे रेल्वेसेवेलाही फटका बसलाय. 8 ट्रेन्स रद्द करण्यात आल्यात. सध्या गुजरातमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close