…त्यांनी मलाही मारलं असतं, शीनाचा भाऊ मिखाईलचा खुलासा

August 27, 2015 2:58 PM0 commentsViews:

27 ऑगस्ट : शीना बोरा हत्या प्रकरणी चौकशी सत्र सुरू आहे. या चौकशी सत्रात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. शीनाचा भाऊ मिखाईलने मलाही त्यांनी मारलं असतं अशी जाहीर खुलासा केलाय. शीनाची हत्या ही संपत्तीच्या वादातून झालीये असा दावाही मिखाईलने केलाय.

mikhail_sot34पोलिसांनीही शीनाचा भाऊ मिखाईललाही मारण्याचा कट होता असा संशय व्यक्त केलाय. मिखाईल शीनाचा ठावठिकाणा सातत्यानं विचारत होता. आणि त्यामुळेच मिखाईल हा इंद्राणी आणि आधीचा पती संजीव खन्नाच्या टार्गेटवर होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. याला मिखाईलनेही दुजोरा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close