राणेंच्या ‘पाटीलकी’वर सेनेचा घणाघात

August 27, 2015 3:29 PM4 commentsViews:

27 ऑगस्ट : गुजरातमध्ये ओबीसी आरक्षणावरुन वणवा पेटलाय. पटेल समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा दुजोरा देत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पाटलांनो, पटेलांकडून काही तरी शिका आणि एकत्र व्हा असं आवाहनच राणे यांनी केलंय. तर शिवसेनेनं राणेंना आपल्या स्टाईलने उत्तर दिलं असून कुणी काहीही डरकाळ्या फोडू नये असा सणसणीत टोला सेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.rane vs raut

काँग्रेसचे नेते नारायण राणे बुधवारी लातूर दौर्‍यावर होते. यावेळी राणेंनी लातूर शहरा नजीकच्या दुष्काळी भागाची पाहणी केली.
दुष्काळ पाहणीत राणे यांच्या सोबत काँग्रेसच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शेकडो गाड्यांचा ताफा होता. पण त्यांची ही भेट होती फक्त पाच मिनिटांची…दुष्काळी दौरा असला तरी राणे विरोधकाला धारेवर धरणं विसरले नाहीत.

मुख्यमंत्री आणि सेनेवर सवयीप्रमाणे आजही राणेंनी टीका केलीय. गुजरातमध्ये पटेल समाज आज रस्त्यावर उतरलाय. पण त्यांच्यात कमालीची एकजूट आहे. त्यामुळेच आज गुजरात पेटलंय. आणि आपल्याकडे बहुजन समाजात एकजूट नाही. काहीही घटलं तरी एकत्र येत नाही. त्यामुळे हार्दिक पटेल यांचं हार्दिक अभिनंदन करण्यासारखं आहे. एकजूट कशी असावी ती हार्दिक पटेल यांच्याकडून पाटलांनी शिकावी असं आवाहन राणेंनी केली.

राणेंच्या या आवाहनाचं शिवसेनेनं समाचार घेतलाय. या महाराष्ट्रातला मराठी माणूस शिवसेनेनं एकत्र केलाय. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे. त्यामुळे कुणी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी आम्ही मराठी म्हणूनच एकत्र राहु असं प्रतिउत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • dattatray pawar

  आम्ही मराठी म्हणूनच एकत्र राहु असं प्रतिउत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं, खरं मग मराठी – मराठी म्हणून “मराठा” गमावणार नक्की! मराठा समाजाला आरक्षण मिळावे महणून … काहीतरी तोंड उघडलं पाहिजे शिवसेनेने … शिवसेनेला आज पर्यंत मराठा समाजाने भरपूर सहकार्य केलं आहे …पण शिवसेनेने मराठा समाजासाठी काय केल …
  शिवसेनेला आम्ही लहानपणापासून आमचा पक्ष म्हणून आम्ही बघत आलो आहोत … आम्हांस मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून आम्ही फक्त शिवसेनेलाच मतदान करीत आलो आहे.
  पण आता नाही …

  • Nitin Pophale Patil

   PAWAR SAHEBANCH BAROBAR AAHE AATA NAHI KARAYCH YANNA MATDAN….

 • Nitin Pophale Patil

  PRATTEK PAKSH MARATHA SAMAJACHA KAMA PURTA,VOTEBANK MHANUN WAPAR KARTOY

 • Mangesh Barhate

  आरक्षण Means Support for handicapped people.

close