आणखी एक जिवंत दहशतवादी पकडला

August 27, 2015 4:18 PM0 commentsViews:

pak terrorists arrest27 ऑगस्ट : नावेद उर्फ उस्माननंतर भारताने आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहे. सज्जाद असं या दहशतवाद्याचं नाव आहे.. जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याला पकडण्यात आलंय. एकाच महिन्यात दुसरा दहशतवादी पकडल्यामुळे पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडलाय.

बारामुल्ला भागात राफियाबाद इथं सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडलंय. पकडलेला दहशतवादी सज्जाद असून हा 22 वर्षांचा तरुण आहे. सज्जाद हा बलुचिस्तानचा नागरिक असल्याचं कळतंय. त्याच्याकडून एके- 47 आणि स्फोटकं जप्त करण्यात आलीये. गेल्या 24 तासांपासून चकमक सुरू आहे. अजूनही जवानांचं सर्च ऑपेरशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उधमपूरमधून दहशतवादी मोहम्मद नावेद उर्फ उस्मान  खानला जिवंत पकडण्यात आलं होतं. नावेद सध्या एनआएच्या ताब्यात आहे. आणि आता आणखी एक जिवंत दहशतवादी पकडण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close