शिबू सोरेन करणार सत्तास्थापनेचा दावा

December 26, 2009 9:44 AM0 commentsViews: 6

26 डिसेंबरझारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, जनता दल युनायटेड आणि भाजप यांचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे 18, भाजपचे 18, जनता दल युनायटेडचे 2, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे 5 आमदार आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये पुन्हा शिबू सोरेन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहेत.

close