इस्रोने जीसॅट-6 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

August 27, 2015 6:15 PM0 commentsViews:

dgagsioeygyasgy

27 ऑगस्ट : इस्त्रोने श्रीहरिकोट इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही-डी6 रॉकेटद्वारे जीसॅट-6 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. जीसॅट-6 हा देशाचा सर्वाधिक आधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी दुपारी 4.52 मिनिटांनी हा उपग्रह आकाशात सोडण्यात आला.

इस्त्रोने तयार केलेला जीसॅट-6 हा 25 वा उपग्रह आहे. हा उपग्रह 9 वर्ष कार्यरत राहणार आहे. एस बँड आणि सी बँड वापर करणार्‍यांना या उपग्रहचा विशेष उपयोग होणार आहे. यापूर्वीच्या GSLV चं प्रक्षेपण जानेवारी 2014 मध्ये झालं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close