IBN लोकमत इम्पॅक्ट, चौरंब गावाला अधिकार्‍यांनी दिली भेट

August 27, 2015 10:33 PM0 commentsViews:

Nanded

27 ऑगस्ट : नांदेडमधील हदगाव तालुक्यातलं चौरंबा या गावात मातंग समाजबांधवांसोबत पाळली जाणारी अस्पृश्यता आयबीएन लोकमतने चव्हाट्यावर आणताच प्रशासनाला अखेर जाग आली आहे. तिथले प्रांत आणि तहसिलदारानी चौरंबा गावाला आज भेट घेतली असून, पोलिसांनीही या गावात आता बंदोबस्त लावला आहे.

चौरंबा या गावात हाटकर, आदिवासी आणि मातंग समाजाचे लोक राहतात.प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र विहीर आहे. दुष्काळामुळे मातंग समाजाच्या परिसरातील विहीरी आटली. त्यामुळे मातंग समाजातील महिलांना नाइलाजाने हाटकर वाड्यातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी जाव लागतं. मात्र मातंग बांधवांना गावातिल सार्वजानिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव केला होतं. पाणी भरायला आलेल्या महिलांना इथल्या गावगुंडाच्या शिविगाळ आणि मारहाणीचा सामना करावा लागायचा.

दरम्यान या प्रकरणी मनाठा पोलिसांनी नागरी हक्क कायदा , आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुण 10 जणांना अटक केली .सध्या गावात तणाव असून मातंग समाजातील लोक प्रचंड दहशतीत आहे. आयबीएन लोकमतने ही अस्पृश्यता जगासमोर आणताच प्रशासन खडबडून जागं झाल आणि मातंग समाज बांधवांना सार्वजनिक विहिरींवर पाणी भरण्यास मूभा देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close