आंध्रचे राज्यपाल एन.डी. तिवारी यांचा राजीनामा

December 26, 2009 9:47 AM0 commentsViews: 3

26 डिसेंबरसेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा आरोप झाल्याने आंध्र प्रदेशचे राज्यपाल एन.डी. तिवारी यांनी राजीनामा दिला आहे. तिवारींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. राष्ट्रपती कार्यालयाने तो राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. तिवारी यांचा एका सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा आरोप एका लोकल टीव्ही चॅनेलनं केला होता. राजभवनमध्ये तिवारी काही मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचे फोटो लोकल चॅनलनं दाखवले होते. या मुलींपैकीच एकीने हे फोटो दिल्याचा दावा या चॅनेलने केला आहे. काँग्रेसने जाहीरपणे तिवारी यांच्यावरचा आरोप नाकारला आहे. पण राजीनामा देण्यासाठी पक्षाने तिवारी यांच्यावर दबाव टाकला होता.

close