बीडमध्ये महाप्रसादातून पाचशे भाविकांना विषबाधा

August 27, 2015 11:17 PM0 commentsViews:

vlcsnap-2015-08-27-23h16m29s327 ऑगस्ट : परळी तालुक्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसाद म्हणून साबूदाणा खिचडी खाल्ल्याने पाचशेहून अधिक भाविकांना विषबाधा झाली. या सर्व भाविकांना उपचारासाठी बीडमधील विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावणी एकादशीनिमित्त गाडे पिंपळगावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साबूदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर भाविकांना अचानक उलटय़ांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने मिळेल त्या वाहनाने भाविकांना शिर्साळा आणि परळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनलेल्या भाविकांना अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी परळी येथील शासकीय रूग्णालयात जाऊन भाविकांची विचारपूस केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close