बांगलादेश दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

December 26, 2009 9:49 AM0 commentsViews: 4

26 डिसेंबर भारताच्या बांगलादेश दौर्‍यात होणार्‍या ट्रँग्युलर सीरिजसाठी शुक्रवारी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण टेस्ट सीरिजसाठी मात्र तो टीममध्ये परतेल. ईशांत शर्मा आणि प्रवीण कुमारला वन डे टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर रणजी क्रिकेटमध्ये तीनशे रन्स करणार्‍या रोहित शर्माची टीममध्ये वर्णी लागलीय. दुखापतीतून सावरलेला युवराज सिंग आणि स्वाईन फ्ल्युमधून बरा झालेला श्रीसंतचा टीममध्ये परतलेत. याशिवाय अमित मिश्रा आणि अशोक दिंडाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. येत्या चार जानेवारीपासून भारताचा बांगलादेश दौरा सुरु होणार आहे. या दौर्‍यात भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या टीमचा समावेश आहे. तर सतरा जानेवारीपासून भारतीय टीम बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळेल.

close