दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार कुणाची वाट पाहतंय -अण्णा हजारे

August 28, 2015 9:01 AM0 commentsViews:

anna34563428 ऑगस्ट : राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी कुणाची वाट बघत आहे असा खडासवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अण्णा -अण्णा हजारेजिल्ह्यातील कवठा या गावी आले होते भारत विकास संस्थेच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबाना अण्णा हजारे यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली तर शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.

पवार भूमिका का बदलतायत ? -राजू शेट्टी

दरम्यान, दुष्काळाच्या राजकारणात काही खंड पडत नाही. उस्मानाबादमध्ये कालच्या दुष्काळी दौर्‍यात राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवारांचा पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा शेतकर्‍यांची कर्ज किती वेळा माफ करायची, अशी भूमिका पवारांनी घेतली होती. आता पवार भूमिका का बदलतायत, असं शेट्टी म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close