ख्रिसमसच्या सुट्टीमुळे धार्मिक स्थळांना जत्रेचं स्वरुप

December 26, 2009 9:51 AM0 commentsViews: 23

26 डिसेंबर ख्रिसमसच्या सुट्टीमुळे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमली आहे. शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. शुक्रवारी ख्रिसमसची सुट्टी त्याला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे. शिर्डीतली सर्व हॉटेल्स, भक्तनिवास हाऊसफुल झालेत. साई संस्थानाने या आधिच 3 जिसेंबर पर्यंत VIP पास बंद केले आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे पंढरपूरमध्येही सुमारे 2 लाख भाविकांची गर्दी झाली. लवकर दर्शनासाठी VIP भक्तांची दादागिरी सुरू आहे. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पंढरपूरमध्ये गर्दीचं नियोजन कोलमडलं आहे. कोल्हापुरातही भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

close