कुंभमेळ्यामुळे भिवंडीत 50 हजार वेअर हाऊस 12 दिवस बंद

August 28, 2015 2:11 PM0 commentsViews:

bhivandi wer28 ऑगस्ट : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळच्या 50 हजार वेअर हाऊस 12 दिवस बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. यानिर्णयामुळे वेअर हॉउस मालक, ट्रान्सपोर्टस आणि रोजंदारी कामगार प्रचंड नाराज आहेत.

नाशिकमध्ये होणार्‍या कुंभमेळ्यासाठी ठाणे, कोकण, गुजरात, आणि परदेशातूनसुमारे 25 लाख भाविक जाणार असल्याचा अंदाज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा आहे. हे सर्व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मार्गे नाशिकला जाणार आहे. त्यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांनी मिळून 50 हजार वेअर हाऊस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र जर काही वाहतूक कोंडी झाली तर लोढा बिल्डर, भूमी बिल्डर आणि इतर लोकानी कुंभ मेळ्याच्या भाविकांची राहण्याची आणि जेवणाची सोय या मार्गावर केली आहे. सुमारे 5 लाख रोजंदारी, माथाडी आणि ट्रांसपोर्टर यांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांना आता 12 दिवस वेतन मिळणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यानिर्णयामुळे वेअर हाऊस मालक अडचणीत आले असून त्यानी याबाबत सरकारकडे विनंती केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close