कृष्णा पाटीलने केलं ‘विल्सेन मॅसिस’ शिखर सर

December 26, 2009 9:53 AM0 commentsViews: 1

26 डिसेंबर गिर्यारोहक कृष्णा पाटील हीने अंटार्टिका खंडातलं 'विल्सेन मॅसिस' हे 4 हजार 897 मीटर उंचीचं शिखर सर केलं आहे. ''विल्सेन मॅसिस' 'चा प्रवास कृष्णाने 13 डिसेंबरला सुरु केला होता. पुढे या मोहिमेत अजून सात गिर्यारोहक आणि काही शास्त्रज्ञ समाविष्ट झाले. हा संपूर्ण ताफा लूशिन 76 टीडी या विशेष विमानाने अंटार्टिकातल्या पेट्रीयाट हिल बेसकॅम्पवर पोहचले. येथुन केवळ बर्फाच्छादित प्रदेश आणि उणे 25 तापमान असलेल्या या प्रदेशातून कृष्णाने आपला प्रवास 21 डिसेंबरला सुरु केला. 24 डिसेंबरला विल्सेन मॅसिसवर यशस्वीपणे चढाई केली. याआधी कृष्णानं माऊंट एव्हरेट हे जगातलं सगळ्यात उंच शिखर पार केलं आहे. अंटार्टिकातला हा संपूर्ण प्रवास तिनं आपल्या ब्लॉगवरही लिहिलाय.

close