रायगडमध्ये सापडलेले अवशेष शीनाचे आहेत का? फॉरेन्सिक तपास सुरू

August 28, 2015 5:55 PM0 commentsViews:

IndiaTva52577_Sheena

28 ऑगस्ट :शीना बोरा खुन प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चाललीय. या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. पेणजवळच्या जंगलात मुंबई पोलिसांना एक मानवी कवटी आणि काही हाडे सापडली आहेत. ते अवशेष शीनाच्याच मृतदेहाचे आहेत की नाही याची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पडताळणी सुरू आहे.

तर दुसरीकडे पीटर मुखर्जी आणि शीना बोराचा भाऊ मिखाईल यांचीही मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आला. मिखाईल आज सकाळीच गुवाहाटीवरून मुंबईत आलाय. दरम्यान, इंद्राणी , तिचा चालक श्याम रॉय आणि संजीव खन्ना यांच्या पोलीस कोठडीत कोर्टाने आज पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत वाढ केलीय. या तिघांचीही आज समोरासमोर चौकशी करण्यात मारियांनी चौकशी केल्याचं कळतंय.

शीनाच्या मृतदेहाची पेणच्या जंगलात ज्याठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली, तिथे मुंबई पोलिसांची टीम गेली होती. सुमारे 6 ते 7 तास शोध घेतल्यानंतर पोलिसांना एक कवटी आणि काही हाडे पोलिसांना सापडली. या अवशेषांची मुंबईत फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते अवशेष शीनाचे आहेत की नाही, हे स्पष्ट होईल. पोलिसांना शीनाच्या डीएनएचे नमुने मिळाले आहेत. ते इंद्राणीच्या डीएनएसोबत जुळवण्यात येणार आहेत. 2012 मध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या शीनाच्या मृतदेहाच्या हाडाचे नमुने रायगड पोलिसांनी जपून ठेवले होते. तर दुसरीकडे आमच्याकडेही शीनाच्या बॉडीचे काही अवशेष असल्याचा दावा जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांनी केला होता मात्र काही वेळातच त्यांनी यू टर्न घेत याबद्दल खात्री करुनच पुढची माहीती देवू अशी सारवासारव केली आहे. आता मुंबई टीमला मिळालेला आणि जे जे मध्ये असणारे अवशेषांपैकी शीनाच्या अवशेष कोणते हाच प्रश्न सध्या समोर आहे. त्यामुळे या अवशेषांबद्दलच्या फॉरेन्सिक विभागाच्या अहवाला नंतर पोलिसांच्या हाती या प्रकरणातला सबळ पुरावा लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close