बनावट क्रेडिट कार्डने चोरी करणार्‍या तरूणांचा पर्दाफाश, चोरी सीसीटीव्हीत कैद

August 28, 2015 6:42 PM0 commentsViews:

28 ऑगस्ट : आजवर तुम्ही चोरी झालेली असंख्य सीसीटीव्ही फुटेज पाहिली असतील पण आज आम्ही तुम्हाला चोराला रंगेहाथ पकडून देणारं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. दुकानदारांच्या प्रसंगावधानामुळे पोलीस आणि तक्रारदार या क्रेडीट कार्ड चोरट्यांना रंगेहात पकडू दिलं आहे. तब्बल 1 लाख 13 हजाराची चोरी या बनावट क्रेडिट कार्डमार्फत करण्यात आली होती.

Byiendart a;erhuay

भाईंदर इथल्या नवघर रोडवरच्या शिवशक्ती इलेक्ट्रॉनिक्‌स या दुकानातून ही चोरी होत होती. सोमवारी संध्याकाळी या दुकानात दोन तरुण शिरले. काही वेळातच 3 एलसीडी टीव्ही आणि मायक्रोवेव्ह विकत घेतले. खरेदी झाल्यानंतर या युवकांनी क्रेडीट कार्ड ने बिल भरलं. यावेळी त्यांनी सर्व सामानानाची हँड डिलीव्हरी मागवली. विनवणी करूनही घरी दिलीव्हरी करण्यासाठी नकार दिल्याने दुकानदाराला संशय आला.

त्यानंतर, क्रेडिट कार्डच्या मालकाला खरेदी केल्याचा एसएमएस आला आणि त्याने फोन करून आपण कोणतीही खरेदी केलं नसल्याचं सांगितलं. त्यावरून हा सर्व प्रकार उघडकीला आला. सध्या या दोघांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close