झारखंडमध्ये भाजपचं सरकार येणार – नितीन गडकरी

December 26, 2009 9:55 AM0 commentsViews: 4

26 डिसेंबर झारखंडमध्येही भाजपचंच सरकार येईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. झारखंड मध्ये त्रिशंकु अवस्था असल्याने सरकार कोण स्थापन करणार याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये संभ्रम आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन गडकरी शनिवारी प्रथमच मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. गडकरी यांच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमिला भेट दिली. यानंतर ते चर्चगेट इथल्या भाजपच्या ऑफिसात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गडकरी सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

close