बारामतीचा तोतया आयपीएस पवार पोलिसांच्या ताब्यात

August 28, 2015 3:07 PM0 commentsViews:

Öêê˻ָüÝÖÖêê»ÖÖßÆüÝÖÖê

28 ऑगस्ट : खरं तर लोकांना फसवणार्‍या, तोतया लोकांना पकडणं हे पोलिसांचं काम. मात्र पुण्यात पोलिसांच्या वेशात बोगसगिरी करणार्‍या एका तोतया पोलिसाला खर्‍याखुर्‍या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

श्रीकांत पवार असं तोतया पोलिसाच्या रुपात फिरणार्‍या आरोपीचं नाव आहे. तो आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून लोकांना गंडा घालत असे. श्रीकांत पवार हा बारामतीचा रहिवासी आहे.

विशेष म्हणजे श्रीकांत पवारने गावकर्‍यांकडून सत्कारही स्वीकारला आहे. याशिवाय तो पोलिसाची वर्दी घालून लोकांची फसवणूक करत असे. शुक्रवारी पुण्याच्या कोरेगावमध्ये एका मुलीची फसवणूक करताना पोलिसांनी त्याला अटक केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close