शीनाच्या मृतदेहाच्या अवशेषांची होणार डीएनए चाचणी

August 29, 2015 10:44 AM0 commentsViews:

pozariuesioajrpy

29 ऑगस्ट : मुंबई पोलिसांच्या टीमला रायगड इथल्या जंगलातून मिळालेले अवशेष शीना बोराचेच असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारियांनी स्पष्ट केलं आहे. आज या अवशेषांना डीएनए तपासणीसाठी पाठवलं जाणार आहे. तर गुन्ह्याचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन रायगडकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, शीना बोराच्या हत्येचा कटात आपला असल्याची कबुली इंद्राणी मुखर्जी यांचे दुसरे पती संजीव खन्ना यांनी शुक्रवारी दिली. तसंच शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल यानंही काही पुरावे दिले असून, त्याची पडताळणी करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली. यामुळे शीना बोराच्या हत्येचं गूढ आता उकलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर डेहरादून इथून तिचा पासपोर्टही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

शीनाच्या मृतदेहाची पेणच्या जंगलात ज्याठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली, तिथे काल (शुक्रवारी) मुंबई पोलिसांची टीम गेली होती. सुमारे 6 ते 7 तास शोध घेतल्यानंतर पोलिसांना एक कवटी आणि काही हाडे सापडली. ते डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं जाणार आहेत. त्यावरून हा मृतदेह शीनाचाच असल्याचं स्पष्ट होऊ शकणार आहे.

दरम्यान संजीव खन्ना यांना वांद्रे कोर्टाने 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मिखाईलही मुंबईत दाखल झाला आहे. तसंच इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, मिखाईल, इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय यांच्यासह इतर संबंधितांची काल (शुक्रवारी) एकत्र चौकशी करण्यात आली. यावेळी खन्ना यांनी कटात सहभाग असल्याची कबुली दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close