शीना बोरा हत्येप्रकरणी रायगड पोलिसांच्या चौकशीचे आदेश

August 29, 2015 12:55 PM0 commentsViews:

sheena bora case29 ऑगस्ट : शीना बोरा हत्येच्या तपासात हलगर्जीपणा करणार्‍या रायगड पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीवदयाळ शर्मा यांनी दिले आहेत.

2012मध्ये शीना बोरा हिची हत्या करण्यात आली होती. रायगड जिल्हयातील पेणच्या जंगलात तिच्या मृतदेहची विल्हेवाट लावण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी रायगड पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे याप्रकरणाशी संबंधीत सर्व पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close