फिरोजशाह कोटलावर पुढचे तीन महिने मॅच नाही

December 28, 2009 9:53 AM0 commentsViews: 3

28 डिसेंबर फिरोझशाह कोटला स्टेडिअमवर पुढचे तीन महिने मॅच न भरवण्याची भूमिका दिल्ली क्रिकेट असोसिएशनने घेतली आहे. शिवाय बीसीसीआयनेही हस्तक्षेप करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधली एकही मॅच कोटलावर होणार नाही, असं जाहीर केलं आहे. कोटलाची मॅच रविवारी खराब पिचमुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मॅच रेफरींनी आपला अहवाल रविवारीच आयसीसीकडे सोपवला होता. याप्रकरणी आयसीसी काय कारवाई करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट हे सध्या दिल्लीत आहेत. याविषयीचा निर्णय घाईघाईत घेण्यात येणार नाही, असं त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं आहे.

close