दुष्काळासाठी वेळ पडल्यास कर्जही काढू -मुख्यमंत्री

August 29, 2015 1:39 PM0 commentsViews:

CM in UArangabad29 ऑगस्ट : शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

पावसाने पाठ भिरवल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीये. मुख्यमंत्री आज अहमदनगरमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या नियोजित दुष्काळी दौरा 1 सप्टेंबरपासून करणार असल्याचं सांगितलं. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमध्येही दुष्काळाची तीव्रता आहे. त्यामुळे सुरुवात मराठवाड्यापासून करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्जही काढू असंही फडणवीस म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close