स्वतंत्र तेलंगणाचं आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न

December 28, 2009 9:59 AM0 commentsViews: 2

28 डिसेंबर स्वतंत्र तेलंगणाचं आंदोलन दडपण्यासाठी आता पोलीस बळाचा वापर सुरू झाला आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची सोमवारी पोलिसांनी उचलबांगडी केली. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन हुसकावून लावलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं कारण देत, पोलिसांनी ही कारवाई केली. त्याबरोबरच विद्यार्थी संघटनांनी 30 तारखेला बंदची हाक दिली होती. मात्र त्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करत, विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केल्याने उस्मानिया विद्यापीठात तणावाचं वातावरण आहे.

close