हार्दिक पटेल यांनी बाळासाहेबांचा आदर्शही घ्यावा -उद्धव ठाकरे

August 29, 2015 5:03 PM0 commentsViews:

uddhav on h patel29 ऑगस्ट : बाळासाहेबांचा आदर्श ठेवत असतील तर त्यांच्या सारखे वागावे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेल यांना लगावलाय.

गुजरातमधल्या पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी बाळासाहेब ठाकरे आपले आदर्श आहे. सरदार पटेल आणि बाळासाहेब यांना मी खूप मानतो, ते कणखर निर्णय घ्यायचे आणि त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं, असं पटेल म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेल यांच्या व्यक्तव्याचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जर आपण ठेवत असाल तर ती चांगली गोष्ट आहे. पण,त्यांच्या सारखे वागावे असा टोलाही उद्धव यांनी लगावला. दिल्ली येथील औरंगजेब मार्गाच्या नावावर चाललेल्या वादावरही उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत मला दिल्ली महापालिकेचा अभिमान आहे असे सांगून औरंगजेब आपला कोणी लागत नव्हता भारतरत्न असलेल्या व्यक्तीचे नाव देत असेल तर ही कौतुकाची गोष्ट आहे असं परखड मत व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close