36 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमध्ये एंट्री

August 29, 2015 5:48 PM0 commentsViews:

ind hocky team29 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमने ब्राझीलमधील रिओ शहरात होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवलाय. तब्बल 36 तासांनंतर भारतीय महिला हॉकी टीम आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.

हॉकी इंडिया (एचआई) ने याबद्दल दुजोरा दिलाय. भारत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतो अशी माहिती शुक्रवारी उशीरा रात्री आंतराराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआईएच) ने दिली अशी माहिती एचआईने दिली. भारतीय टीमने 1980 ला मास्को ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत भारताने चौथे स्थान पटकावले होते.

36 वर्षांनंतर आता भारतीय हॉकी महिला किंवा पुरूष टीम सहभागी होत आहे. भारताला ऑलिम्पिकचे तिकीट हे स्पेनच्या पराभवामुळे मिळाले. युरो हॉकी चॅम्पियनशीपमध्ये इंग्लंडने स्पेनचा पराभव केला. या पराभवामुळे स्पेनची टीम ऑलिम्पिकच्या बाहेर पडली. युरो चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहचलेल्या इंग्लंड आणि नेदरलँड टीम अगोदरच ऑलिम्पिक प्रवेश मिळवलाय.

भारतीय पुरूष टीमने अगोदरच या वर्षी आशियाई कप जिंकल्यामुळे ऑलिम्पिक तिकिट मिळवले आहे. आता महिला टीमनेही प्रवेश मिळवलाय. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्ट 2016 मध्ये आयोजित करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close