शीना बोरा : रायगड पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात

August 29, 2015 7:32 PM0 commentsViews:

shenna bora_raigad case29 ऑगस्ट : शीना बोरा हत्याप्रकरणी रायगड पोलिसांची भूमिका आता संशयाच्या भोवर्‍यात सापडलीये. रायगड पोलिसांकडून आज (शनिवारी) या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. शीनाचा मृतदेह 2012 सालीच पोलिसांना सापडला असतानाही त्यावेळी गुन्हा नोंदवला गेला नाही,असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. यासंबंधात जे जे हॉस्पिटलकडून अहवाल मिळवायलाही चालढकल झाली. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटते आहे. यासंबंधी आयजी दर्जाच्या अधिकार्‍याकडून चौकशी सुरू आहे असं रायगडचे एसपी सुवेझ हक यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत सुवेज हक यांचा खुलासा

23 मे 2012 मध्ये गागोदे खिंडींत एक अर्धवट जळलेला अवस्थेत मानवी सांगाडा सापडला होता. याबद्दल पेण पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने मृतदेहासंदर्भात माहिती दिली होती. पोलीस अधिकार्‍यानी या जागेवर जावून पंचनामा केला. पंचनामा केला, प्रत्यक्षदर्शीचे जबानी घेतल्यामात्र पोलिसांनी अपघाती मृत्यू किंवा खूनाचा गुन्हा दाखल केला नाही. याबद्दल जे जे हॉस्पिटमध्ये मृतदेहाचे अवशेष पाठवले. मात्र अजूनपर्यंत हॉस्पिटलने रिपोर्ट पाठवले नाही. रायगड पोलिसांनीही कधी मागितले नाही. पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडून याची चौकशी सुरी केली आहे. चौकशीचा रिपोर्ट सादर केला जाईल. चौकशी अंती रिपोर्ट वरीष्ठांना सोपवण्यात येईल

पोलीस तपासातले मुद्दे

- ’23 मे 2012 ला शीनाच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाविषयी एका व्यक्तीने रायगड पोलिसांना माहिती दिली’
-‘रायगड पोलिसांनी अपघाती मृत्यू किंवा खुनाचा गुन्हा दाखल केला नाही’
– ‘रायगड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रत्यक्षदशीर्ंचे जबाब नोंदवले’
-‘रायगड पोलिसांनी जे.जे. हॉस्पिटलला मृतदेहाचे अवशेष पाठवले’
-‘जे.जे हॉस्पिटलनं यासंबंधी रिपोर्ट पाठवला नाही’
-‘रायगड पोलिसांनीही रिपोर्टची मागणी केली नाही’
-‘IG दर्जाच्या अधिकार्‍याकडून याविषयी चौकशी सुरू’

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close