देश मजबूत करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प

December 28, 2009 10:08 AM0 commentsViews: 1

28डिसेंबर सामान्य माणूस आणि युवकांना सोबत घेऊन देश मजबूत करण्याची ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. काँग्रेसच्या 125 व्या वर्षपूर्ती समारंभाच्या निमित्त पंतप्रधानांनी हा संकल्प केला आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला सोमवारी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सोमवारी दिल्लीतल्या कोटला रोडवर 'इंदिरा भवन' हे काँग्रेसचं नवं मुख्यालय साकारण्यात आलं आहे. या मुख्यालयाची कोनशिला सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते बसवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसच्या 125 व्या वर्षपूर्ती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.

close