नितीन गडकरींनी घेतली बाळासाहेबांची भेट

December 28, 2009 10:11 AM0 commentsViews: 1

28 डिसेंबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास बाळासाहेब आणि गडकरींची चर्चा झाली. विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावरुन शिवसेना-भाजप यांच्यातले संबंध ताणले गेलेत त्यावर या भेटीत चर्चा होऊ शकते असं म्हंटल जात होतं. पण हि एक सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रीया नितीन गडकरी यांनी दिली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर गडकरी पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले होते.

close