राखी बांधण्यासाठी हजारो महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाला घेराव

August 29, 2015 9:08 PM0 commentsViews:

29 ऑगस्ट : नागपूरमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानावर आज हजारो शेतकरी विधवा महिलांनी मोर्चा काढला. या सर्व महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधायला आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री अहमदनगरला गेले असल्यामुळे त्यांची भेट होवू शकली नाही.

nagpur news4343आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍याच्या समस्या सोडवण्यासाठी या महिलांनी नागपूर गाठलं होतं. मुख्यमंत्र्याच्या वतीनं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महिलांचं निवेदन स्विकारलं. मंगळवारी यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन पाच महिलांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री भेटतील असे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close