परभणीवर दुष्काळाचं सावट, पिकंही गेली आता पेरणीही नाही !

August 29, 2015 9:13 PM1 commentViews:

parbhani rain_no

29 ऑगस्ट : मराठवाड्यावर दिवसेंदिवस दुष्काळाचे ढग गडद होत चालले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सलग तिसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस पडलाय. त्यामुळे जिल्ह्यात खरीपाच्या पिकावर शेतकर्‍यांना पाणी सोडावं लागतंय. शेतकर्‍यांनी  कापूस,सोयाबीन,तूर,मुग,उडीद या पिकांची पेरणी केली होती.

अत्यल्प पावसामुळे आता दुबार पेरणीचीही शक्यता मावळली. जिल्हातील सर्व मध्यम, लघू प्रकल्पात सरासरी 2 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आता पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये, टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या अस्मानी सकंटामुळे आता सामान्य गृहिणीपासून ते शेतकर सर्वच अडचणीत आले आहे.

परभणी जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

3 लाख 28 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी
पाण्याअभावी संपूर्ण पिकं वाया
दुबार पेरणीलायक पाऊस नाही
2 मध्यम प्रकल्पांत 2 टक्के पाणीसाठा
22 लघू प्रकल्पांत 1 टक्के पाणीसाठा
पाणीपातळीत 3 मीटरनं घट
जिल्ह्यातील विहिरी, बोअरवेल्स आटल्या
24 टँँकरद्वारे जिल्ह्याला पाणीपुरवठा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Yash Joshi

  महोदय,

  IBN लोकमत वाहिनीवर सध्या रोज शेतक-यांच्या व्यथा मांडल्या जातात. जोवर या व्यथा शेतक-यांच्याशी संबंधित असतात, त्यांसाठी मला सहानुभूति वाटते।

  मात्र जेव्हा आपले पत्रकार संबंधित गावातील तरूणांना “काम-रोजगार” नसल्यामुळे तरूणांना उपासमार होते असे म्हणतात, तेव्हा मला हे पत्रकार ‘दांभिक’ वाटायला लागतात।

  खरोखर आज पुण्यासह समस्त पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात कामासाठी लोक मिळत नाहीत।

  मी स्वतः माझ्या घरातील कामासाठी मागचे ६ महिने Carpenter शोधतोय। “मराठी सुतार” मिळत नाहीत म्हणुन “राजस्थानी सुतारांकडे” विचारणा केली तर ते १ दिवसाच्या कामाचे १५०० ते २००० रुपये मागतात। सुतार शोधण्यासाठी मी अनेकांशी चर्चा केली तर सर्व लोक “सुतार मिळतच नाहीत” हीच तक्रार करतात। जर दिवसाच्या कामाचे १००० मिळत असतील म्हणजेच महिनाभर consistently काम केल्यास २० ते २५ हजार पक्के ।

  मग या फायदेकारक परिस्थितिचा मराठवाड्यातील तरूण का विचार करत नाहीत?????? काम मिळत नाही, म्हणून उपासमार होते, हा युक्तिवाद कसा काय टिकेल??

  खरोखरच पुण्यात अनेक कामांसाठी लोक मिळत नाहीत, हि वास्तविकता आहे.

  उपासमारीच्या कारणास्तव आत्महत्या करण्यापेक्षा तात्पुरते स्थलांतर करण्यास काय हरकत आहे??? अजून एक उदाहरण द्यावेसे वाटते.

  आमच्या आजूबाजूला अनेक सोसायटीत पावसाळ्यात बेसुमार गवत-झाडे-झुडुपे वाढतात. पण गवत कापायला माणसे सहजासहजी मिळत नाहीत. हि माणसे शोधण्यात १०-१५ दिवस लागतात. जे भेटतात , त्यांना हात जोडून बोलावून आणावे लागते .उस तोडणी कामगारांना मिळेल, त्याच्या तिप्पट पैसे मोजून कामगार आणावे लागतात.

  कसा काय आपल्या वृत्तावर विश्वास ठेवावा?????

close