दाभोलकर, पानसरेंच्या पाठोपाठ ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या

August 30, 2015 1:44 PM1 commentViews:

Prof. Kalburgi as

30 ऑगस्ट : प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम एम कलबुर्गी यांची धरवाड इथे अज्ञात व्यक्तींनी आज गोळ्या झाडून हत्या केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर आणखी एका विचारवंताची हत्या करण्यात आली. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे कनार्टकात खळबळ उडाली आहे.

धारवाडमधील कल्याणनगर भागात कलबुर्गी यांचं निवासस्थान आहे. बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेलं पणउपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून कलबुर्गी यांना हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर केलेल्या टिपण्णीमुळे धमक्या येत होत्या. डॉ. कलबुर्गी यांच्यावरच्या हल्ल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि त्यांच्या चाहत्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.

डॉ. कलबुर्गी यांच्यावरच्या हल्ल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि त्यांच्या चाहत्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. डॉ. कलबुर्गी हे कनार्टकातील ज्येष्ठ विचारवंत म्हणून ओखळले जात होते. कलबुर्गी यांना केंद्र सरकारने साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. याबरोबरच त्यांना कर्नाटक सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार, तसंच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. हिंदुत्ववादी विचारांविरोधात त्यांनी टीकात्मक लिखाण केलं होतं.

कोण होते एम. एम. कलबुर्गी?

– ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि विचारवंत
– हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरू
– अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचे
– इतिहास संशोधक
– संत महात्मा बसवेश्वर यांच्या “बसवण्णाची वचने”वर त्यांनी संशोधन केलंय
– कन्नडमधील 12व्या शतकातील संत महात्मा बसवेश्वर यांच्या “बसवण्णाची वचने”वर त्यांनी संशोधन आणि विशेष लिखाण केले होते.
– 2006 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरव

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • pravin marathe

    kay atta eka sabhya mansala aaple mat mandnyacha va vichar pradarshit karnyacha adhikar he badotri gund athva tya patimagil vyakti ,phakt tyacha jiv gheunach hiravu shaktat kay. ani kaydyache palan kara mhantat ithe sabhya mansachi kayada tapsni karto ani ghunegar mhatara hoiparyant arramat jivan jagto. kay tar mhantat aamhi chaukashi karat aahot yapeksha roj ek gabbar tayar zala tar kay vaait? kamit kamit kami garibala nyay lavkar tar milel !

close