झारखंडच्या विकासासाठीच शिबू सोरेनना पाठिंबा – नितीन गडकरी

December 28, 2009 12:42 PM0 commentsViews: 4

28 डिसेंबर झारखंडच्या विकासासाठीच भाजपने शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात या 2 नेत्यांची भेट झाली. यावेळी झारखंडमधल्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. सत्ता समीकरणांमधल्या मतभेदांमुळे झामुमो आणि काँग्रेस यांच्यात बिनसलं. त्यानंतर झारखंडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शिबू सोरेन यांना भाजपने पाठिंबा दिला. झारखंडमध्ये भाजपच्या पाठींब्यावर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर शिबू सोरेन यांनी सोमवारी मुंबईत येऊन नितीन गडकरींची भेट घेतली. दोन्ही पक्षांमधली सत्ता स्थापनेची औपचारिक चर्चा पूर्ण झाली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ घेतील.

close