मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल

August 30, 2015 2:26 PM0 commentsViews:

Vinod kambli

30 ऑगस्ट : माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि त्याची पत्नीने मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पगार मागितला म्हणून विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे.

विनोद कांबळीच्या घरी काम करणार्‍या मोलकरणीचा आणि कांबळीमध्ये पगारावरुन वाद होता. मोलकरणीने कांबळी यांच्याकडे पगारवाढ मागितली होती. या वादावरून त्यांनी तिला घरात डांबून ठेवलं आणि मारहाणही केली असा आरोप त्यांच्या मोलकरणीने केला आहे. मुंबईतल्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कांबळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close