पटेल आरक्षणासाठी देशभर आंदोलन करणार – हार्दिक पटेल

August 30, 2015 4:53 PM0 commentsViews:

hardik patel

30 ऑगस्ट : पटेलांच्या ओबीसी आरक्षणाचा आवाज देशभर पोहोचवला जाईल, असं म्हणत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आज (रविवारी) नवी दिल्लीत पोहोचला आहे. पटेल आरक्षणासाठी जाट आणि गुज्जर समाजाच्या नेत्यांच्या भेटीसाठी हार्दिक पटेल आज नवी दिल्लीत दाखल झाला. जाट समाजाच्या नेत्यांसोबत आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत त्याने चर्चा केली.

त्यानंतर पटेल आरक्षणाच्या आंदोलनाबाबतच्या रणनीतीची माहिती देताना हे आंदोलन देशभर पोहचवण्याचा निर्धार हार्दिकने व्यक्त केला. त्यासाठी जाट आणि गुज्जर समाजाच्या पाठिंब्याची गरज असल्याचेही त्याने नमूद केलं. पटेल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देशभरात पोहोचवणार, जिथे जिथे पटेल समाजाला माझी गरज असेल तिथे मी जाणार असल्याचंही त्याने सांगितलं.

गेल्या काही दिवसांपूर्वी पटेलांना ओबीसी आरक्षण द्यावं, यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात गुजरातमध्ये आंदोलन पेटलं होतं. ज्यात नऊ जणांचा मृत्यू ,तर कोट्यवधींचे नुकसानही झालं होतं.
सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळण्यासाठी पटेल समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी पटेल समाजाची मागणी आहे. नेमकी हीच मागणी जाट आणि गुज्जर समाजाची असल्याने आगामी काळात आरक्षणासाठी पेटल, जाट आणि गुज्जर एकत्रितपणे मोठं जनआंदोलन छेडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close