देहविक्री करणार्‍या मुलींचं पुनर्वसन

August 30, 2015 7:01 PM0 commentsViews:

वेश्या व्यवसायाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडलेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी वन फाऊंडेशनने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पाच महिलांनाच्या हस्ते करण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माधुरी दीक्षित, मेरी कॉम, अमृता फडणवीस, आणि शिखा शर्मा यांनी रँपवर चालत अशा मुलींच्या भवितव्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. हॉटेल ट्रायडेन्टमधे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विवेक ओबेरॉय उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close