बोरज धरण पाणी दूषित प्रकरणी गावकरी आणि मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

December 28, 2009 12:44 PM0 commentsViews: 6

28 डिसेंबर बोरज धरणाच्या दूषित पाणीप्रकरणी प्रांत अधिकारी मंगेश जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकर्‍यांनी गोंधळ घातला. लोटे एमआयडीसीतल्या सर्व कंपन्या आजच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. कंपन्या बंद न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. पाणी दूषित केल्याप्रकरणी रत्नागिरीच्या खेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात कंपनी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लोटे एमआयडीसीतल्या 50 केमिकल कंपन्यांना तहसीलदारांनी नोटीसा बजावल्यात. एका केमिकल कंपनीने बोरज धरणात केमिकलमिशि्रत पाणी सोडलं. त्यामुळे खेडचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाविरुध्द खेड तहसीलदारांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. बोरज धरण रिकामं करण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी नगरपालिकेची बैठक होत आहे. सध्या खेड शहराला नातू नगर धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे.

close