सलमान खानचा जामीन रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

August 31, 2015 1:15 PM0 commentsViews:

salmankhan

31 ऑगस्ट : फुटपाथ अपघाता प्रकरणी अभिनेता सलमान खान याला मुंबई हाय कोर्टाने दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.

फुटपाथ अपघाता प्रकरणी सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून, त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात सलमान खानने लगेचच हाय कोर्टात धाव घेतली. हाय कोर्टाने सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देत सलमान खानच्या जामिनाची मुदत वाढवण्याचे निर्देष दिले. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जाऊन नव्याने कागदपत्रे सादर करून जामीनाची मुदत वाढवून घेतली. फुटपाथ अपघाता प्रकरणी सुनावणी सध्या हाय कोर्टात सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close