‘संथारा’वर बंदी घालण्याच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

August 31, 2015 3:20 PM0 commentsViews:

santhara 2

31 ऑगस्ट : जैन समुदायाच्या संथारा प्रथेवर बंदी लादण्याच्या राजस्थान हाय कोर्टाच्या निर्णयाला आज सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाचे जैन समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले.

जैन समाजामध्ये पूर्वापार चालत आलेल्या संथारा प्रथेला राजस्थान हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत त्यावर बंदी घातली होती. हा आत्महत्येचा एक प्रकार असल्याचं राजस्थान हायकोर्टाने म्हटलं होतं.

या निर्णयाविरोधात अखिल भारतीय वर्षीय दिगंबर जैन परिषदेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राजस्थान हाय कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवत संथारा प्रथेवरील बंदीला स्थगिती दिली.

मृत्यू जवळ आल्यानंतर अन्न-पाण्याचा त्याग करणं याला जैन समाजामध्ये संथारा प्रथा म्हणतात. ही प्रथा जीवन संपवण्याची प्रक्रिया नाही, तर आत्म्याला कर्मांमधून मुक्त करण्याची प्रक्रिया आहे, असं या परिषदेचं म्हणणं आहे.

मात्र, हा प्रकार म्हणजे आत्महत्या असल्याचं म्हणत संथारा प्रथेचा अवलंब करण्यावर राजस्थान हाय कोर्टाने बंदी घातली होती. तसंच हे व्रत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close