शीना बोरा हत्याप्रकरणी : तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

August 31, 2015 5:41 PM0 commentsViews:

asfresarjkoweky

31 ऑगस्ट : शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत आज (सोमवारी) 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरकडे अटकेत असणार्‍या इंद्राणी मुखर्जीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. शीनाच्या हत्येनंतर आपल्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न इंद्राणीनं अनेकदा केला होता, असा आरोप शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल बोरा याने केला होता. याचा तपास करत असताना यासंदर्भातले पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, इंद्राणीवर आता खुनाबरोबरच कलम 307 म्हणजेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोर्टात इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांनी घरचं जेवण मिळण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यातून त्यांच्यावर विषप्रयोग केला जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. तसंच इंद्राणी मुखर्जीला आज कोर्टामध्ये मुलगी विधीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. तर, पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप इंद्राणी मुखर्जीने केला आहे. इंद्राणीची भेट घेतल्यानंतर तिच्या वकिलांनी पोलीस आयुक्त राकेश मारियांकडे याबाबत तक्रार देखील केली आहे. पोलीस तिच्याकडून जबरदस्ती गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या वकीलांचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close