अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

August 31, 2015 2:31 PM0 commentsViews:

amitabh asbabsr;jy

31 ऑगस्ट : अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यात फॉलोविंग लिस्टमध्ये ‘सेक्स साइट्स’ टाकण्यात आल्या होत्या. खुद्द अमिताभ यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. ते कुणी केलं ते अजून कळू शकलेलं नसलं तरी बिग बींनी यावरही मिष्किल प्रतिक्रिया दिली.

ओहो…! माझं ट्विटर हँडल हॅक केलंय!, माझ्या फॉलोविंग लिस्टमध्ये सेक्स साइट्स प्लांट करण्यात आल्यात. ज्याने कुणी हे कृत्य केलं असेल त्याला एवढंच सांगेन की, हा प्रयोग दुसर्‍या कुणावर तरी करा मला या सर्वातीी गरज नाही., असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.

अमिताभ यांचं ट्विटर अकाऊंट प्रचंड लोकप्रिय आहे. ट्विटर अकाऊंटवर अमिताभ यांचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. दिवसभरातल्या घडामोडी आणि आठवणी बिग बी ट्विटर अकाऊंटवरून रोज आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close