हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

September 1, 2015 8:10 AM0 commentsViews:

vashi

01 सप्टेंबर : ऐन सकाळच्या वेळेस हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत पडली आहे. वाशी रेल्वेस्टेशनजवळ अज्ञात चोरट्यांनी ट्रॅकवरील केबल कापून चोरल्यानं हार्बर मार्गावरची रेल्वे सेवा खंडित झाली होती. त्यामुळे पनवेलहून मुंबईकडे येणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. सकाळी कामाला जाण्याच्या वेळेतचं वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा खोळंबा उडाला आहे. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली असल्याच सांगितलं जातय. केबल कापल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला त्यामुळे हार्बर मार्गावरची सेवा दोन तास ठप्प झाली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close