कोपरगावात शिवसेना शहरप्रमुखावर गोळीबार

September 1, 2015 12:57 PM0 commentsViews:

êÖêןÖáÖ¸êüÖ¯ÖÖêŸÖÆü߯ÖÆü

01 सप्टेंबर : शिर्डीजवळच्या कोपरगावात शिवसेना शहरप्रमुख भरत मोरे आणि त्यांचे सहकारी साजिद पठाण यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात मोरे आणि पठाण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगाच्या टाकळीनाका परिसरात हा गोळीबार करण्यात आला. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी मोरे आणि पठाण यांच्यावर गोळीबार केला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने दोघेही या हल्ल्यातून बचावले. दरम्यान, मोरे यांनी काही दिवसांपूर्वी वाळूतस्कारांविरोधात जोरदार मोहिम उघडली होती. त्यामुळेच हा हल्ला झाला असण्याची शक्यता शिवसेना शहरप्रमुख मोरे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close