शीना आणि मिखाईल ही माझीच मुलं, सिद्धार्थ दासचा दावा

September 1, 2015 2:05 PM0 commentsViews:

Siddharth Das

01 सप्टेंबर : शीना आणि मिखाईल ही माझीच मुलं असून इंद्राणीला नेहमीच उच्चभ्रू वर्ग आणि पैशाचं आकर्षण होतं असा दावा इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास यांनी केला आहे. त्याचबरोबर शीनाच्या हत्याप्रकरणी मुंबई पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रॉय यांच्या पोलीस कोठडीत काल (सोमवारी) 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याच आली आहे.पण इतके दिवस इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होता. अखेर सिद्धार्थ दास यांचा शोध लागला असून ते सध्या कोलकात्यात आहेत. सिद्धार्थ दास यांनी आज (मंगळवारी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

इंद्राणीनं मला 1989 साली सोडलं आणि त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. मी तिच्याशी लग्न केलं नव्हतं. 1989 पर्यंत आम्ही मुलांसोबत एकत्र रहायचो. शीना आणि मिखाईल हे दोघेही माझीच मुलं असून हे सिद्ध करण्यासाठी मी डीएनए चाचणी करायलाही तयार आहे. इंद्राणीला आधीपासूनच खूप महत्त्वकांक्षी होती. उच्चब्रू आयुष्य जगायची तिला खूप इच्छा होती आणि त्यासाठी ती काहीही करू शकते. ती शीनाचीही हत्या करु शकते. या खुनाबद्दल मला काहीच माहित नाही. मला पोलिसांना सहकार्य करून त्यांना मदत करायची आहे. अजून तरी मुंबई पोलिसांनी मला संपर्क केलेला नाही. शीनाची हत्यारांना मृत्यूदंडांची शिक्षा द्यायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शीनाची हत्या केल्यानंतर इंद्राणी मुखर्जीने तिला पेणच्या जंगलात कारमध्ये बसलेल्या अवस्थेत नेले. शीनाला मारल्यानंतर इंद्राणी, आणि तिचा पती संजीव खन्ना यांनी शीनाला कारच्या पाठीमागच्या सीटवर दोघांच्यामध्ये बसवलं होतं. कारमध्ये शीनाला अशा पद्धतीने बसवण्यात आलं होतं की जणू ती झोपलीच आहे. जर पोलिसांनी नाकाबंदी केली तर शीना झोपलेली आहे असं सांगायचं अशी त्यांची योजना होती. पोलीस नाकाबंदीच्या वेळी डीकी तपासातात परंतु प्रवाशांना उठवत नाहीत म्हणून तिला सिटींग पोजीशनमध्ये न्यायचे असं ठरवण्यात आलं होतं. जेव्हा ते जंगलात पोहचले त्यानंतरच तिला सुटकेसमध्ये कोंबण्यात आले. मृत्यूनंतर काही तास शरीर हे लवचिक असतं. याचाच फायदा घेऊन इंद्राणी आणि संजीवनं हे धक्कादाय कृत्य केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close